दर्पण
दर्पण
दर्पणा सांग जराशी
चाहुल लागेल सजणाची
दिसते मी कशी सांग ना ?
मी बावरी वेळ नजरानजरेची
पाऊल माझे पडे यौवनात
धडधड उरी कंपने काळजात
चंचल हरिणी मी तारुण्यात
नजर झुकते साजन हद्यांत
केश भुरभुरते वारयावरी
गाल गुलाबी नेञात शराब
मोहुन गेले मीच मला
ओठांवर मकरंद चाल बेधुंद
कुठे आताच बहरली वेल
हळुवार उमलेन हळु खुलव
आज प्रितीचे पहिलेच पाऊल
हिंदोळ्यात अधांतरी झुलव
अडखळते बावरते अल्लड
मन आज गेले आठवांस शरण
एकेक गुंतले वचन शपथ कर
हवास तु आले जरी मरण

