या बटांना
या बटांना
या बटांना सावरु नको
वारा आहे खट्याळ गं
चेहऱ्यावरती फुलवी लाली
नेत्रात उमलवी लाज गं ......
झुळक हवेची अंग स्पर्शिता
बटा लहरती कपोल गाली
तयातुनी मग नजर बावरी
सांग कुणा शोधती गं.......
चंचल वारा बटा छेडीता
कळी मनाची अलगद फुले
गालावरती गुलाब हसवे
सागं कुणासाठी गं फुले......
केस रेशमी ,छटा गुलाबी
बटा बटातुनी सौंदर्य खुले
मना मनाचे धुंद झोके
सागं कुणासाठी गं झुले.........