STORYMIRROR

Narendra Potdar

Romance Tragedy Action

2  

Narendra Potdar

Romance Tragedy Action

एक फुल

एक फुल

1 min
57

एक फुलं कधीचचं 

मनात रुजलेलं ….

रोज नजरेत उमलणारं

वाटतं सतत बघत रहावं

एक सारखं…..!

मन कधी भरतं नाही

नजरेची तृष्णा कधी भागतचं नाही !

पाकळ्यांनी रंग परिधान करावं

तशी जणु वेशभुषा बदलतं असतं

चेहऱ्यावरचं स्मित करीत

मला आकर्षित करीत असतं !

रोज रोज नविन वाटावं

तस डोळ्यापुढे विहारतं

कधी काळजाच्या फांदीवर

हळुवार झुलतं असतं

पाकळ्यांचा पदर सावरीतं 

पानातुन लाजतं असतं!

किती गोड ! बोलकं ते फुलं 

पण माझ्याशी अबोल असतं

वाटतं…….

कधीतरी हवेची झुळक होऊन 

स्पर्शुन जावं मनाला

हृदयातील गुपित ,सांगून जावं जीवाला

भाळलेल्या ....त्या फुलाने !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance