STORYMIRROR

Narendra Potdar

Tragedy

2  

Narendra Potdar

Tragedy

निरोप

निरोप

1 min
36

निरोप घेतांना 

पाय पुढे पडे ना

डोळ्यातील आसवांना

थांबवता येई ना…

आई बाबा सोबतचे 

दिवस काही विसरे ना

लहानपणचा लाड

तयांचा मनातुन जाई ना….

अगंनातील खेळमांडी

खाऊचा डब्बा भुले ना

आई समोरचा हट्ट

बाबाचां हात घट्ट सुटे ना ….

घराच्या चार भिंतीतला 

सहवास मज छेडतोय नां

आठवणीतील प्रत्येक कोपरा

साथ माझी मागतोय ना….

आई बाबाच्या काळजाचा

तुकडा मी ! बंध सुटे ना ...

सरहद्द मायेच्या रक्ताची

ओलांडताना निरोप घेता येई ना… 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy