STORYMIRROR

Narendra Potdar

Others

3  

Narendra Potdar

Others

वाट

वाट

1 min
209

किती शोधायचे तुला

नजर थकुन गेली

डोळ्यातील आसवांनी

पापणी भरुन गेली.....


किती जपायचे जीवाला

एकाकी होऊन गेला

भेटी विना इथे तुझ्या

जीव व्याकुळ होऊन गेला...


किती आठवायचे तुला

क्षण कमी पडाया लागले

काळजाचे अंतरंग तुजविणा

आता दुभंगाया लागले....


किती बघायची वाट

रस्ते ओसान जाहली

माझिया मनाच्या सागराला

ओहटी दिसाया लागली...


साहित्याला गुण द्या
लॉग इन