पूर्णत्व...
पूर्णत्व...


पंख हवे
मुक्ततेचे बंधनांना
कुंपण हवे
सैरभैर विचारांना
संयम हवे
वैफल्य भावनांना
पूर्णत्व हवे
आशा-आकांक्षांना
गाठ हवी
खऱ्या नात्यांना
सुगंध हवा
प्रित फुलांना
रित हवी
सामाजिक पंरपरांना
साथ हवी
सत्य वचनांना
फ्रेम हवी
नव्या धोरणांना
कल्पकता हवी
कविच्या कल्पनांना
चैतन्य हवे
जीवन जगताना.....