जीवनाचे स्वप्न
जीवनाचे स्वप्न
जीवनाचे स्वप्न, मी तुझ्यात गं पाहीले
गंधाळल्या हास्यात, तुझ्या गं रोज नाहले
निर्मळ पाण्यावरी, तुझे रुप साकारता
लोचने मिटवित , प्रणय गीत गायिले
दर्पनी नयनात, चित्र तुझे रेखाटतांना
रुपेरी सौंदर्यात, तुझ्या इंद्रधनु शोधिले
मोरपिस स्पर्शाने, अंगी चांदने शहारता
काळजात स्पंदने ,तुज मनी मी उभारले
प्रकाशात संधीकाळी ,सागर किनाऱ्याला
भरतीतल्या प्रितीला, बाहुत मी गं स्विकारले....

