चारोळ्या
चारोळ्या


1)
हसनं तुझं बोलकं असतं
प्रतिसादाविना राहुन जातं....
ओठावरच्या शब्दांना मुकेपण
का बरं मग तू देवुन जातं.....
2)
जायचे आता दूर देशी
कठीन पावलांनी दुर सोडुनी मोह सारे
कळाले होणार ना कधी प्रीतीबंध
कळवुनही काव्यातुनी भावनांचे मर्म सारे....
3)
आली भरती सागराला
नेत्राता नेत्र भुलतांना...
रंगला खेळ अविट गोडीचा
ऊरी शरदाचे चांदने पडतांना....
४)
तुझी एक शुभेच्छा
लाखोचं बळ असतं !
तुझ्याशिवाय इतरांचे शब्द
मजकरीता गौण असतं....