STORYMIRROR

Narendra Potdar

Romance

3  

Narendra Potdar

Romance

रोज रोज ये

रोज रोज ये

1 min
299

स्मित हास्यांच्या नाजूक फुलांनी

रोज रोज ये तू मज फुलवायला

ओठावरती ओथंबलेले बोल अंतरीचे 

रोज रोज ये तू मज सांगायला...


रुपेरी चाहुलींना, वाट माझी दावण्या

साद घालूनी पैंजणी, ये मज कळवायला

ओंजळीत फुले सुगंधी तुज आवडीची

रोज रोज ये घेवूनी मज गंधाळायला...

  

नात्यास स्पर्श असावे रेशमी मोरपीसाचे

रोज रोज ये मज जाणीव त्यांची द्यायला

काळजात अंकुरुन प्रित भाव वेडी

रोज रोज ये तू मजशी घट्ट बांधायाला...


असेल मनी, अनेक थैमान विचारांचे

क्षमवून वादळाला, ये मज भेटायला

इथेही विरल्यात तापल्या शब्दांच्या फेरी

सागरी किनाऱ्यास ये शांतता शोधायला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance