STORYMIRROR

Narendra Potdar

Others

4  

Narendra Potdar

Others

अधुरे

अधुरे

1 min
390

एक चित्र रेखाटलेले

नव्या आशेचे

अजुनही अधुरे

तुझ्या रंगाविना.....


एक स्वप्न सजविलेले

उमलत्या जीवनाचे

अजुनही अधुरे

तुझ्या सहवासाविना....


एक आशा वेडीपीसी

आयुष्य जगण्यासाठी

अजुनही अधुरी

तुझ्या भावनेविना....


एक नाते जगावेगळे

नव्या युगाचे

अजुनही अधुरे

तुझ्या सहकार्याविना....


एक प्रतिक्रिया कवितांवर

भावनेने भरलेली

अजुनही अधुरी

तुझ्या शब्दाविना.....


एक अंतिम श्वास

मिटण्या थांबलेला

अजुनही अधुरा

डोळ्यात तुज भरल्याविना..


Rate this content
Log in