STORYMIRROR

Kapilraje Nangare

Romance

3  

Kapilraje Nangare

Romance

त्या किनारी

त्या किनारी

1 min
29.7K


केव्हातरी पहाटे, मी बसलो होतो किनारी,

आठवत तिचीच स्वप्ने, पाहत होतो पाणी 

नव्हतो कधी मी, आधी कोणाच्या रे प्रेमात,

कळलेच नाही केव्हा, कधी बंदिस्त झालो तिच्यात 

बहरत होते आमुचे, कोवळे कोवळे नाते, 

तेव्हाच कळले मला, हे जीवन प्रीतीचे गीत गाते 

चमकत होते चांदणे, नभी या मनात,

 फुलत प्रकाश गेला, साथ काजव्यांच्या गर्तेत 

घडले असे नव्हते, कधी ते घडले अकस्मात,

उसवली स्वप्ने सारी, जेव्हा आली एक लाट 

काहीच न सांगता, गेली सोडून मला ती,

आसवांच्या गर्दीत, एकट्याला ढकलून मला ती 

रुमालास माझ्या, सुगंध येतो मोगर्‍याचा अजून,

आठवण येते तिची, जेव्हा तिला पाहतो नभातून 

मिटले चुकून डोळे, तर येते ती समोरून 

डोळेच न मिटता, बसतो मी किनारी म्हणून 

न पाहिलं मला कोणी, देताना हुंदके हवेत 

पाहतो तो किनारा म्हणून, घेतो तो मला कवेत 

कळले मला न तेव्हा,आभार कसे मानावे 

सागर बोलला तेव्हा, आयूष्य जगत रहावे




এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন

Similar marathi poem from Romance