STORYMIRROR

kishor zote

Romance

3  

kishor zote

Romance

हात तुझा माझ्या हाती

हात तुझा माझ्या हाती

1 min
28.4K


हात तुझा माझ्या हाती

( अष्टाक्षरी )


जाण्या क्षितीजा पल्याड

मन माझे बहरते

हात तुझा माझ्या हाती

अंग अंग शहारते ॥१॥


हास्य तुझे चांदण्यात

खुलवते चांदरात

सडा पारिजातकाचा

बघ माझ्या ओंजळीत ॥२॥


घट्ट तुझा सहवास

बोटे बोटांत गुंफले

वारा अवखळ झाला

गुज कानी सांगीतले ॥३॥


क्षण क्षण सोबतीचा

गेला होवून गंधीत

नशा तुझ्याच डोळ्यांची

गेली मला बुडवीत ॥४॥


भास म्हणावे की स्वप्न

तेच आता हो कळेना

आता तर सोबतीला

वेळ थांबता थांबेना ॥५॥


हवा तीचा सहवास

इच्छा संपता संपेना

आता सोसेना दूरावा

क्षण एक करमेना ॥६॥


सारी बंधने तोडावी

एक जावेत होवून

श्वास श्वासात गंधीत

प्रित यावी ती फुलुन ॥७॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance