पहाना कधीतरि
पहाना कधीतरि
पहाना कधीतरि,डोकावूनी
अंतकरनात आहे एक प्रेमनगरी
आहेत माझ्या छोट्याशा नाजुकशा कल्पना
करूनी भावनांशी दोस्ती,जागल्या आहेत उरी
रोज नव्याने देतात या माझ्या मनाला उभारी
सांगेल मी प्रीतीची तुजला गोष्ट सारी
पहाना कधीतरि, डोकावूनी
अंतकरणात आहे एक प्रेमनगरी...
वाहतो आहे प्रेमझरा नित्य प्रेमनगरित माझ्या
मी तर अखंड डुबले आहे प्रेमसागरात पाहूनी नयनात तुझ्या
रोज एक प्रेमदिप करिते प्रेमसागरास अपॆण ,मनी आकांशा ठेवून ही
साथीच्या पावलांनी बहरेल माझी प्रेमनगरी
पहाना कधीतरि, डोकावूनी
अंत:करणात आहे एक प्रेमनगरी...
एकांतात असता मी, तूच स्फुरतो ह्रदयी
जाऊनी खोल अंतरात न्याहळते,मी तुझी सुंदर छबी
अंतरंगात मग रंग तुझे भरते रोज नव्याने
प्रीतीचा श्ंगार लेवूनी वाट तूझी पाहत राहते ऊभी प्रेमद्वारी
पहाना कधीतरि, डोकावूनी
अंत:करणात आहे एक प्रेमनगरी...

