STORYMIRROR

Prajakta Vetal

Others

3  

Prajakta Vetal

Others

होईल का एक पहाट अशीही

होईल का एक पहाट अशीही

1 min
225

होईल का एक पहाट अशीही

देशादेशातील सीमा एकमेकीत मिसळुनी

         होतील का नष्ट...

राष्ट्रवाद संपुनी, मानवतावाद घेईल का जन्म

धर्म, देश, वंश हा भेदभाव संपुनी,

संवेदनशीलतेचा फुटेल का पाझर प्रत्येक मनी

          देश, धर्माची ओळख सोडूनी,

माणुस सांगेल का ओळख स्वताची एक माणूस म्हणोनी

ठेच लागता कोणत्या जीवाला

अन्याय ,अत्याचाराचे थैमान माजले असता,

मानवतेचा खुलेआम कल्त होताना,

होवुन एकजुट 'मानवता धर्म' जाणून,

सारे देतील का लढा अन्यायाविरुद्ध....

मग् होवुन विजय मानवतेचा,

फुलेल या वसुंधरेवर 'शांततामय आनंदी सहजीवन'

होईल का एक पहाट अशीही

देशादेशातील सीमा एकमेकीत मिसळुनी 

         होतील का नष्ट...


Rate this content
Log in