STORYMIRROR

Prajakta Vetal

Others

4  

Prajakta Vetal

Others

21 व्या शतकातली स्त्री

21 व्या शतकातली स्त्री

1 min
916

क्षितीजापार दृष्टी खिळवून आहे

मी एकविसाव्या शतकातली स्त्री आहे

कर्तृत्वाला माझ्या साहसाचे पंख आहेत


कमजोर नाही, नाजुक आहे

मजबूर नाही, कोमल आहे

मोहमाया नाही, सुंदर आहे


दासी नाही, सहकारी आहे

स्पर्धक नाही, साथी आहे

वंशवेल नाही, सृजनमातृत्वधारिणी आहे


घायाळ नाही, धैर्यशील आहे

अभिमानी नाही, स्वाभिमानी आहे

लाचार नाही, नम्र आहे


उद्धट नाही, परखड आहे

नव्या व्यक्तित्वाला माझ्या

शाश्वत ममतेची झालर आहे


भावनाशील आहे म्हणुनी

याचिकाकर्ती समजू नकोस

सहनशीलतेला माझ्या अबलता

समजु नकोस,


भावनाशील आहे, सहनशील आहे, क्षमाशील आहे

म्हणुनच परिवाराला एकसंध

ठेवणारी मी किमया आहे


आजुबाजूला नात्यांचा मनमोहक

पिसारा बाळगुनी आहे

खोट्या प्रतिष्ठेपायी पावित्र्य-मांगल्याच्या

चुकीच्या संज्ञेत मला तोलू नको


माझ्या निखळ भावनेचे प्रतिबिंब

खोल अंतरात जावुनी पाहा

एकदा माझा हात हाती घेऊनी

वाऱ्यासम धावून पाहा


खोलवर नात्यात आपुल्या

उतरुन पाहा

जिथे उंची संपते अशा जीवनाच्या

सर्वोच्च उंचीवरी जावून पाहा


Rate this content
Log in