STORYMIRROR

Prajakta Vetal

Others

4  

Prajakta Vetal

Others

तारुण्य बहार.

तारुण्य बहार.

1 min
28.5K


मला चाहुल नवविचारांची

आशा उभी द्वारी स्वप्नांच्या,

स्वागताला उभ्या ठाकल्या

नवकल्पना,माझ्या तारुण्य बहाराच्या


मी चाहती क्षितीजाची

मी चाहती उडत्या पाखराची

मी चाहती सुगम ज्ञानाची

मी चाहती नवसाम्राज्याची

मी चाहती उत्क्रांतीची

मी चाहती विश्वप्रेमाची

मी खळी विश्वहास्याच्या गालावर पडलेली तारुण्य बहाराची...


मी ओळख पावित्र्याची

मी श्ंगार मांगल्याचा

मी धगधगता अग्नी ध्येयासक्तीचा

मी भविष्यवाणी यशाची

मी गाथा सर्जनशीलतेची

मी हक्कदार उद्याच्या कलाक् तीची

मी कळी विश्व संस्कृतीच्या कुशीतुन उमललेली नवतारुण्यची...


मला चाहुल नवविचारांची

आशा उभी द्वारी स्वप्नांच्या,

स्वागताला उभ्या ठाकल्या

नवकल्पना,माझ्या तारुण्य बहाराच्या


Rate this content
Log in