पुन्हा मोकळा श्वास घेण्यासाठी
पुन्हा मोकळा श्वास घेण्यासाठी
'जनता कर्फ्यु' भारत सरकारकडून अपील आहे
रविवार दि.22/03/2020 या दिवशी सकाळी
7 ते रात्री 9 वाजेपर्यंत बाहेर न पडण्याचे
जनतेला आवाहन आहे
कारण 'कोरोना' ने जगभर
धुमाकुळ घातलाय
हजारो लोकांचा जीव घेतलाय
इटली, इराणमध्ये
सध्या स्थिती दयनीय आहे
चीनने आताच कुठे मोकळा श्वास सोडलाय
एकंदरित परिस्थिती लक्षात घेऊन
सद्सद् विवेकबुद्धीचा वापर करु
केंद्र आणि राज्य सरकारच्या सुचनांचे पालन करु
विसरु नका लोकसंख्येच्या दृष्टीने भारत जगात दुसऱ्या
क्रमांकावर आहे
तरुण देश म्हणुन भारताची ओळख आहे
भविष्यात जनसांख्यिकीय लाभांश मिळण्याचे संकेत आहेत
आणि या प्रगतीच्या उंबरठ्यावर हे 'Pandemic Disease'चं संकट उभ ठाकलं आहे
तेव्हा सावध व्हा, काळजी घ्या, स्वच्छता बाळगा आणि सहकार्य करा
सारे भेदभाव बाजुला ठेवा
राजकारण बाजुला ठेवा
विरोध प्रदर्शने ही जरा वेळ बाजुलाच राहु द्या
सगळे आपण एक होऊ, या महामारी रोगाचा
साहसाने आणि विवेकबुद्धीने सामना करु
डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, पोलीस यंत्रणा इत्यादी मोठ्या हिंमतीने लढत आहेत
त्यांचे कृतज्ञ राहू,
मा. प्रधानमंत्री मोदी यांच्या आवाहनानुसार
रविवार सायंकाळी 5 वाजता 5 मिनिटे
घराच्या दरवाज्यासमोर उभे राहुन
त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचा हौसला वाढवू
आपण सर्वजण स्वदक्षता आणि
सरकार आणि जनतेमधील परस्पर सहकार्यातून
या महामारीच्या जागतिक संकटावर मात करु
