तू जाशील निघूनी भ्रमर होऊनी...
तू जाशील निघूनी भ्रमर होऊनी...


दोन घटिकांचा खेळ खेळूनी
काही क्षणांचा आस्वाद घेवूनी
तू जाशील निघूनी भ्रमर होऊनी
मी नारी अशी, राहशील नित्य
ध्यानी मनी माझ्या, तू साथी बनूनी
एकांतात तुला स्मरेल ,एकटीच तुझ्याशी
खुप काही बोलेल
पाहुनी आयन्यात, न्याहाऴेल मी,
माझ्या नयनातली प्रेमज्योत
लाजेल मी, माझ्यात तुच प्रकटला की काय म्हणोणी,
याची जाणीव नसेल तूझ्या मनी
तू जाशील निघुनी भ्रमर होऊनी
मी नारी अशी,राहशील नित्य
ध्यानी मनी माझ्या, तू साथी बनूनी
जगाची रित म्हणोनी,सजेल हातावर म
ाझ्या
कोणा परक्या नावाची मेंहदी
रंगेल ती तिचे कर्तव्य बजावूनी
परि मी तेजोवलयंकीत असेल
तुझ्याच निर्भळ प्रेमकिरणांनी
सुटेल कसा रंग तो,
अंतरात माझ्या प्रीत सजली
तुझ्याच निखळ रंगानी...
भरण्याआधी सिंदूर परके माझ्या भांगामधी
मी देईल माझा प्राण सोडोनी
मजकडे डोळेझाक करूनी
तू जाशील निघुनी भ्रमर होऊनी
मी नारी अशी,राहशील नित्य
ध्यानी मनी माझ्या, तू साथी बनूनी