STORYMIRROR

Prajakta Vetal

Romance

3  

Prajakta Vetal

Romance

हळूवार क्षण...

हळूवार क्षण...

1 min
13.4K


हळूवार क्षण ओंजळीत वेचताना

हलकेच ह्रदयी साठवताना

नव्हतीच मला ही कल्पना,

ह्रदयी तुझ्या नसेल,

कोणतीच संवेदना

हळुवार क्षण ओंजळीत वेचताना...

आभार मानू तुझे कितीदा,

विचार, कल्पना, भावनांचा

सुरेख संगम तू माझ्या मनी साधला,

एक स्थिर भाव मला तु देवून गेला...

आठवते आजही मला,

आसंमतभर फुललेली मी,

नजरेत तुझ्या पाहताना...

हळूवार क्षण ओंजळीत वेचताना...

वेडे खुळेपण माझे,

मी दिले आहे सोडून मागे

नाही धरला हट्ट कोणता प्रेमात तुझ्या

पाहाणारे कसा प्रकटतो तु गीतातून माझ्या

मी आनंद लूटते प्रत्येक क्षणी तूझ्या सोबतीचा

मी भासते एक किमया

सामावून तूला माझ्यात घेताना...

हळूवार क्षण ओंजळीत वेचताना...

              


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance