रिते
रिते
कल्पनांचे मेळे
रिते रिते झाले सगळे,
दूर केलास भ्रम तु
अविरत पाठलाग मी,
ज्याचा केला,
ते मृगजळ तु
हसती मजवर माझे,
विचार खुळे...
कल्पनाचे मेळे
रिते रिते झाले सगळे@@@
असेच मन माझे,
व्हावे रिकामे...
संथ गतीने का होईना,
पण आटावा मम् ह्रदयीचा
प्रेमसागर...
कधीच न यावे मी फिरून
फसव्या त्या वाटेवर...
देतील निष्ठुराचे संबोधन तुला,
नको असे भाव माझ्या मनी
जे तुला ना कळे...
कल्पनांचे मेळे
रिते रिते झाले सगळे@@@
