STORYMIRROR

Prajakta Vetal

Inspirational

4  

Prajakta Vetal

Inspirational

निरंतर सोबत

निरंतर सोबत

1 min
28.9K


अबोल प्रीतीत ,निसर्गाच्या

उबदार कुशीत...

विचार,कल्पना,भावनांचा सुरेख संगम साधत

मी चालले जुन्याच प्रेमनगरीत,ह्रदयी स्फुरणारे प्रेमगीत गात...अवघ्या मानवजातीला साद घालत

सारे आहोत आपण अभिसारिका जशा गोपिका कृृृृष्णाच्या...अन् एकच आहे आपला प्रियकर अलौकीक सौंदर्य घेवुन,आपुले बाहुपाश पसरुन अवतीभवती सर्वत्र उभा निसर्ग,

क्षणाक्षणाचे सोबती आहेत कित्येक

परि दोन क्षणाच्या या पाठशिवणीच्या खेळात..जो करितो दोन क्षणाच्याही मधल्या वेळेत निरंतर सोबत!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational