ख-या प्रेमाला गवसणी घालताना...
ख-या प्रेमाला गवसणी घालताना...
क्षितीजा पलीकडे नजर माझी जाते,
छेद इथल्या प्रत्येक विषमतेला देते
एक नजर माझी जमिनीवरही फिरते,
इथल्या भिन्नतेत असलेले सौंदर्य टिपते
मी नजर माझी दूरवर फेकते,
जगाची अधिकाधिक समृद्धीकडे
होत जाणारी वाटचाल पाहुनी सुखावते...
पण दुस-याच क्षणी नजर माझी
आजही समाजाच्या मुख्य प्रवाहापासुन
वंचित असणा-या,माझ्या निद्रिस्त
भावंडांचा पाठपुरावा करते...
उरात माझ्या क्रांती जन्मते
मी सामाजिक, अर्थिक, राजकीय
आणि सांस्क् तिक भेदभावापलीकडे
इथल्या प्रत्येक माणसाशी
एक माणुसकीचं नातं जोडते!!
