थोडा पाऊस पडणार
थोडा पाऊस पडणार
थोडा पाऊस पडणार,
मग मनाचा मिटला कप्पा उघडणार,
जखमेची खपली निघणार,
डोळ्यातून भळभळणार,
हाय रे देवा!
हळवे कविमन झुरणार
लेखणीतून झरणार,
कवितेला धुमारे फुटणार,
स्वप्न आणि सत्य यात फारकत
हाय रे देवा!
इतर सारे समजावणार
हळुवार फुंकर मारणार,
वास्तवाची जाणीव देणार,
कवीला जमिनीचे भान येणार,
विहरणारा पक्षी परत एकदा स्थिरावणार,
हाय रे देवा!

