STORYMIRROR

Manju Thaware

Others

5  

Manju Thaware

Others

शहरी पाऊस

शहरी पाऊस

1 min
40.6K



आकाशातल्या ढगा,

किती बदलला आहेस रे तू ??

पूर्वी कसा गडगडाट करायचास मनमोकळा,

दणदणाट करायचास, ‌

काळंकुट्ट आवरण घ्यायचास,

सहज समजायचं की आता तो येणार..

हल्ली मात्र तू खूप sophisticated झालायस,

अगदी पोशाखी, शहरी..

हळूच यायचं, कोणाला त्रास होणार नाही असं वागायचं,

तो येण्याची आगाऊ सूचना तर द्यायची,

पण मग अचानक appointment cancel करायची,

आणि मग निघून जायचं, न आवाज करता..

हुलकावणी तर अगदी राजकारण्यासारखी देतोस..

खूप बदलला आहेस रे !!!


घनन घनन पावसा,

किती रे बदलला आहेस तू पण !!!

पूर्वी कसा चार महिने न चुकता यायचास,

आषाढापासून नवरात्रीपर्यंत ,

क्वचित दिवाळीत पण ..

कधी मुसळधार, कधी रिपरिप,

तर कधी संततधार..

नदी- नाले भरून टाकायचास,

आजूबाजूला गाळ टाकून जमीन सुपीक करायचास,

अगदी सूर्य दिसायचा नाही ..

धरेला हिरवा मखमली शालू नेसवून जायचास..

आता मात्र फारच कोरडा झाला आहेस,

रिक्त आणि बेपर्वा झाला आहेस,

बेशिस्त तर खूपच, वेळ काळ पाळत नाहीस,

आणि पडतोस तो नेमका संध्याकाळी,

ऑफिस सुटायच्या वेळी - अगदी शहरी,

तुला आताशा काळे मळके कपडे आवडत नाहीत,

आणि आलास तरी गर्जत येत नाहीस मोकळेपणी,

गळामिठी देत नाहीस , प्रेमाचा वर्षाव होत नाही

येतोस तो अगदी लांबून, थबकून

नुसताच हात मिळवून, कधी हात हलवून

परत जातोस..

किती बदलला आहेस तू !!!!


Rate this content
Log in