" आंबट-गोड "
" आंबट-गोड "
काय सांगू ?
तुझं प्रेम जर आंबट चिंचे सारखं आहे. . .
तर माझं प्रेम कच्या कैरीसारखं आंबट-गोड. . .
लटकून बहरलेलं आणि पिकण्याची वाट पाहणारं
खाऊन तृप्त पण, अतृप्त आत्म्यासारखं . . .
नेहमी हवंहवंसं. . .
काय बोलू ?
तुझं प्रेम जर आंबट लोणच्यासारखं आहे. . .
तर माझं प्रेम मुरलेल्या मुरंब्यासारखं आंबटगोड. . .
बाहेरून डब्बा पाहून मंतरलेलं आणि आत बोट टाकून चव चाखणारं. . .
खूप चविष्ट पण, स्वादिष्ट अमृतासारखं. . .
नेहमी चवीला लागणारं 'सार'. . .
कित्ती सांगू ?
तुझं प्रेम जर आंबट आवळ्यासारखं आहे. . .
तर माझं प्रेम लिंबूसरबत सारखं आंबटगोड. . .
वरून घट्ट पकड असलेलं आवरण तर आतून नरम, रसाळ
खूप रसाळ पण तितकंच खोलवर रुजलेलं. . .
नेहमी शरीराला वैद्य, उपायकारक. . .
कसं सांगू ?
तुझं प्रेम जर आंबट कोकम सारखं आहे
तर माझं प्रेम करवंदा सारखं आंबटगोड. . .
बाहेरून देणाऱ्या फोड
णीसारखं तर आतून सुरेख सोलकडी सारखं. . .
नेहमी सौन्दर्याची अस्तित्व दाखवणारं. . .
काय सांगू ? काय बोलू ?
कित्ती सांगू ? कसं बोलू ?
निर्णयाच्या दाव्यात नसतो ताळमेळ. . .
कारण, तू कॉफी मी चहा, तू रबडी मी खवा
तू खरी मी खोटा, तू दर्द मी दवा...
तू तिखट मी कडू, तू डोसा मी रवा,
तू निखळ मी मनमुराद . . .
तू बोर मी पेरू, तू रांगोळी मी गेरू,
तू पंख मी झेप, तू नटखट मी अलबेल . . .
प्रेमाच्या परीक्षेत तू मात्र 'पास' मी मात्र ह्रदयाचा वेळेत सपशेल 'फेल'
तू लग्नाचा मुहूर्त मी लग्नाच्या मुहूर्ताची साडे-तीन मुहूर्तातली तीच वेळ . . .
तू पेढा मी लाडू,
लग्नात शोभेल तुला भरगच्च शालू . . .
तू शांत मी निवांत,
तू शक्ती मी सहनशक्ती, हा हा हा . . .
तू आंबट मी गोड . . . नाही. . नाही. .
तू गोड मी आंबट . . .
मी तू , तू मी. . . मी आंबट तू गोड . . .
आपलं पोळलेलं, मधाळ, रसाळ, अलवार प्रेम
नुसतं "आंबट-गोड"