Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shreyas Gawde

Romance Classics

3  

Shreyas Gawde

Romance Classics

प्रेमबंधन

प्रेमबंधन

1 min
163



तुझं माझ्यावरचं प्रेम म्हणजे,

तुझा चॉकलेट वरचा चावा जणू. . .

दबक्या हातानी धरलेला,

माझ्या " प्रेमाचा-'भर-वसा' " जणू. . .


जेव्हा तू माझा हात धरतेस,

संपुर्ण जगाला वाटेल हेवा जणू. . .

राधेच्या मधुर प्रेमातला,

कृष्णाच्या हाततला पावा जणू. . .


कैक येतील तुफानी वादळे,

तू झुगारून दिलेला इशारा जणू. . .

माझ्यावरील अतूट विश्वासाचा,

तुझ्या ध्यानी-मनी ध्यास जणू . . .


नियतीने मांडलेला खेळ,

तुझ्या चुटकीसरशी सरला जणू. . .

जोडा आपला लक्ष्मी-नारायणाचा ,

ब्रम्ह मुहूर्ताची वेळ जणू. . .


केले आरोप जरी कित्तीही मोठे,

तुझा मला न सोडण्याचा करार जणू. . .

कानमंत्र स्वच्छंदी आयुष्याचा,

तुझ्या माझ्या संसाराचा भाग जणू . . .


आवड नसली जरी आपण लोकांची,

ओढ तुझी-माझी सतत ची जणू. . .

थरथरत्या हातामध्ये गुंतला तुझा हात,

म्हातारपणातील काठी आपुले प्रेम म्हणू . . 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance