Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shreyas Gawde

Others

3  

Shreyas Gawde

Others

ऐश्या कातरवेळी जीव नकोसा गुंतला

ऐश्या कातरवेळी जीव नकोसा गुंतला

2 mins
224

सांजवेळी मी बसलो एकटा, नको ऐश्या एकटेपणात. .

दिसतो मले पक्षांचा हा थवा ! उंच उडे गगनात !

मेंढी सुद्धा कळपात; गायी,म्हशी परतल्या गोठ्यात

ऐश्या ह्या कातरवेळी मी नकोसा एकटेपणात ।। धृ ।।

का कातरवेळ ही सतावते ? का मले तू आठवते ?

कारण, पानेरी डोळ्याला दिसतो मले पाणवठ्यावर वरचा प्रेम गवा. .

चिमणी आपल्या पिलाला देते ओठी घास मायेचा तो हवा हवा. .

मी मात्र निराळा, ऐश्या कातरवेळी दगड भिरकावीत. . . ।। १ ।।

ऐश्या ह्या कातरवेळी मी नकोसा एकटेपणात ।। धृ ।।

अशी एक वेळ नाही, जेव्हा मले तू दिसतचं नाही. .

भली माझी माय, घरी पोहचल्यावर देते पाणी. .

तसा हा वृक्ष सुद्धा बरा, गर्मी मध्ये देतो छाया . .

असा मी भोळा-बाभडा, दुःख ताजे कुरवाळत ।। २ ।।

ऐश्या ह्या कातरवेळी मी नकोसा एकटेपणात ।। धृ ।।

ही ओढ अनावर , किती राहूनिया गेलेले. . .

कातरवेळ जाय निघूनी दिसे डोक्यावर तारे . .

ऐसा हा काळोख आता मला आपलासा वाटे . . .

आणि माझ्या चंद्राच्या आठवणीत हा चंद्र डोक्यावर सवे . . . ।। ४।।

ऐश्या ह्या कातरवेळी मी नकोसा एकटेपणात ।। धृ ।।

किती मनात काहूर, नको आता मले माझ्या जखमेवर फुंकर. . .

थंड गरव्यातही मी ऊब पाहतो मातीच्या कुशीत. . .

टपोऱ्या या डोळ्यामधले मोती टिपत हा गारवा सजला. . .

परतीच्या वाटेवर जीव ऐसा अवेळी गुंतला. . .।।५।।

ऐश्या ह्या कातरवेळी मी नकोसा एकटेपणात ।। धृ ।।

ऐसे कैसे जाहले आता होत नाही धीर ; मन सुधीर-बुधीर. . .

कसे हासले हे मयूर , काय नाचले मयूर . . .

निसर्गाच्या सानिध्यात ऐसा वेळ हा चटकन सरला. . .

देखोनिया याची डोळा, होते उन्मुक्त जीवन, उन्मुक्त गुंफण. . ।। ६ ।।

ऐश्या ह्या कातरवेळी मी नकोसा एकटेपणात ।। धृ ।।

चालता-चालता , ठेच लागता ऐशी जोराची . . .

मग मी पाहून जागेला, उर दाटून हा आला. .

जिथे शब्दाविना अडखळला; तोच थांबा गवसला. . .

आणि पुन्हा

अन ऐश्या 'परती-वरती' जीव नकोसा गुंतला. .।। ७ ।।

ऐश्या ह्या कातरवेळी मी नकोसा एकटेपणात ।। धृ ।।

Rate this content
Log in