Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Shreyas Gawde

Romance

3  

Shreyas Gawde

Romance

एक झोका

एक झोका

2 mins
518


'झोक' असा मी घेतला तुझ्या जवळ येताना

जशी झुळूक लागते वाऱ्याची जवळ येताना. . .

तसा गार गारवा जाणवतो मला , तुझ्या जवळ येताना. . .

पुढे माझी अशी काही ओळखचं उरत नाही . .

माझ्यात बुडतो मी, तुझ्यात बुडताना. . तुझा होऊन जाताना. . . || धृ ||


वडाच्या पारंब्याची मजबूत गाठ. .

जशी १०० वर्षांची जुनी साथ. . .

त्यावर पाट असा काही बांधला. .

रेशमी ओढणीचा साज उंचमयी झेलला. .

तेव्हा मी तुला एकटक पाहतचं राहिलो; तुझा होऊन जाताना. . तुझा होऊन जाताना. . .|| १ ||


जसा सावली चा सुखवा सुखद होता. .

मृगजळाप्रमाणे तु माळलेल्या 'चाफ्या' चा सुवास दरवळत होता. . .

तसा कोवळ्या सोनेरी उन्हाचा प्रकाश डोकावत होता..

तेव्हा मी माझ्या अंतरंगात गुंतलो; तुझ्या अंतरंगात गुंतताना. .तुझा होऊन जाताना || २ ||


जशी हवेत घेतलीस तू गगनभरारी झेप . .

तत्क्षणी सुरू झाला सारा खेळ. . .

हसताना जेव्हा तुझा गेलेला तोल सावरला होता

तेव्हा माझ्या काळजाचा ठोका चुकला; तुझा ठोका चुकताना. .तुझा होऊन जाताना. .. || ३ ||


शेवटी वेळ सारा सरला होता. .

फक्त खाली 'झोका' थांबला होता. . .

तुझ्या आवरण्याच्या गडबडीत, तू जेव्हा लपलेला मला पहिला होता. .

तेव्हा नेम माझा चुकला ; तुला पाहून चुकचुकताना. . तुझा कायमचा होऊन जाताना. . .   || ४ ||

झोक्याची किंमत आता कळली . .

जेव्हा जागा तिची रिक्त उरली. . .

तिचा भास नसतानाही जाणवत होता. . .

उद्रेक भावनांचा ओंजळीत टिपला, झोक्यावर हळूच बसताना. .तिचाच होऊन जगताना.|| ५ ||


अचानक पाठीमागून एक आवाज आला. .

मागे पाहिल्यावर स्मित हास्याचा साज सजला. . .

दोघांच्याही नजरेतून नजरेचा गुण जुळला. . .

नकळत हात हाती घेताना, हात हाती देताना. . तिचा होऊन  जाताना.. || ६ ||


आता, खाली 'झोका' सुद्धा हलला होता. .

वेळेचा सदुउपयोग आम्हाला खुणावत होता. . .

मग काय ? उंच झोका संगेच घेतला होता. .

दिवस अपुरा पडताना,आनंद बेमुराद लुटताना. . . कातरवेळी सोबत तिची होताना. . . (तुझाच होऊन जाताना) . . . || ७ ||


Rate this content
Log in