चाकरमानी
चाकरमानी
गावच्या घरी यायची आता सर नाही. .
कोळ्याच्या जाळ्यात अडकल्या नात्यांचा एक मेळ नाही. .
जुन्या आठवणींत रमतो असा कोणी एक नाही ..
आणि आतून बंद पडलेल्या घराला कुलुपाची गरज नाही...
ढगाळलेल्या वातावरणात जेव्हा नभ दाटून येतात. .
सर येता-येता आडोश्याची मात्र सोय नाही. . .
उगाच भांड्यात पडतो जीव, नकोश्या नात्यात. .
कारण, उपडी पडलेल्या भांड्याला पावसाच्या थेंबाची आता आस नाही. . .
e="color: rgb(0, 0, 0);">रुपयाची आता किम्मत कवडीमोलची. . .
नूतनीकरण च्या जागी खरी गरज आहे घरास घरपणाची . . .
आंबा, फणस, काजी आता फक्त नावपूरतेच झाडाच्या टांगणीला. . .
एकटा म्हातारा जीव खन्दा घराच्या सोबतीला. . .
घराला दुरून पाहणे इतकीच हौस मौज काय ती उरली आहे. .
गराजवंतांच्या पदर खाली असून पण चिरा ठोकून तो ठाम उभा आहे. . .
हुरहूर होते जीवाची ! भेदरलेल्या भिंती पाहून प्रत्येक क्षणी;
तरी मधुर निघते वाणी, जेव्हा येतो घरी माझा चाकरमानी. . .