एक तुटलेलं मन
एक तुटलेलं मन
नियतीने चालविला हा नवीनच खेळ
आज साधला माझा आणि प्रेमाचा मेळ
एक सुंदर हसीना माझी उडनपरी
घेऊन आली माझ्या आयुष्यात प्रेमाच्या सरी
माझ्या मित्राचे झाले उपकार
की माझ्या आयुष्यात आली प्रेमाची बहार
भेट तिची नि माझी होती पहिली
एकाच भेटीत ती मला खूप भावली
एकदाच का मी तिच्याशी बोललो
तिच्याच विचारात गुंगून गेलो
काहीच सुचेना काय करावे
कधी तिला आपल्या मनातलं सांगावे
पण तिला काय वाटतंय हे जाणायचं होतं
भीती वाटत होती का तिला कोणी आवडतं
जानायच होतं काय चाललंय तिच्या मनात
माझ्या उत्सुकतेला देईल का ती प्रतिसाद
हळूहळू तिची नि माझी छान मैत्री जमली
माझ्या मनाची भाषा आता तीही बोलू लागली
वेळ आली तिला मनातलं सांगण्याची
पण मैत्री तुटणार तर नाही भीति फार वाटायची
एकदा मात्र मी मनातलं बोलूनच दिलं
तिने मात्र अचानक बोलणंच थांबवलं
काय तिचं उत्तर असेल मी विचारात गढलो
जेव्हा तिने होकार दिला मी अगदी वेडावुनच गेलो
आता भेट कधी होईल याचीच हुरहूर वाटे
मला आता तिच्या वाचून क्षणभरही ना करमे
कधी कॅन्टीन कधी गार्डन कधी कॉलेज कधी लिला
जसे जमेल तसे आम्ही जमायचो नेहमी भेटायला
महिन्यातून एकदा तरी मैत्रीणीं सह तिच्या
आम्ही जायचो भ्रमानात निसर्गाच्या
कधी लोणावळा कधी खंडाळा कधी बाग कधी तपोवन
येथे मिळालेत आम्हाला प्रेमातील अविस्मरणीय क्षण
तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपी जावं
हळूच मी माझा हात वर काढून तीला जवळ घ्यावं
अशाच काही गोड क्षणांनी तिनं माझं जीवन रंगवावं
मी पाहिलेल्या स्वप्नांना तीन भरभरून प्रतिसाद द्यावा
सगळे सुरळीत असताना अचानक जसे कालचक्र उलटले
न कळत नकळत ती माझ्या फार लांब निघून गेले
कसा काय हा उन्माद घडला
असा काय अपराध मी केला
माझ्या सर्व स्वप्नांची क्षणार्धात झाली माती
कसा हा माझ्या प्रेमाचा निर्णय आला माझ्या हाती
कधी हा निवडूंग माझ्यासंगे वाढत गेला
हळूहळू माझ्या आनंदाला सुरुंग लावत गेेला
जसा अमरवेलच वेढला आमच्या प्रेमाच्या झाडावर
शोषून घेतलं आयुष्याचं त्याचं एवढ मोठ झाल्यावर
सर्व वचन शपथांच्या भ्रमातून क्षणार्धात तीनं वेगळं केलं
दुःखाच्या या कठीण मार्ग वर मला एकट्याला सोडून दिलं
मी आता या मार्गाच्या शेवटालाच थांबणार
आयुष्यभर तिच्यासाठी अनोळखी बनून राहणार
कधीही ती तिच्या प्रेमाला व्यक्त करू शकते
पण तिच्या आनंदाच्या मार्गात मी खडक नाही बनणार
तिला हक्क आहे ती माझ्यावर प्रेम करणार वा नाही करणार
कितीतरी वचन होती घेतली मात्र ती कधी निभावली
तिच्या विना कसा जगु मी का ती इतकी दूर निघून गेली
मी दिलेलं सर्व काही विसरून ती मात्र गेली सोडून
तिने दिलेल्या क्षणा क्षणांच्या आठवणी गेली देऊन
ते चंद्रावर संदेश पाठवण रात्र-रात्रभर बोलत राहण
मी चुकलो तेव्हा तिचं रागवणं मग माझ तिला मनवण
कधी कुठे भेटलो आम्ही आणि झाली मनांची बेरीज
पण आता पर्यायच नाही ते गोड क्षण वेचण्याखेरीज

