STORYMIRROR

Pradnya Warade Narkhede

Romance

3  

Pradnya Warade Narkhede

Romance

ही रात्र चांदण्यांची...

ही रात्र चांदण्यांची...

1 min
445

तुझ्या येण्याने आयुष्यात 

जगण्याचा आनंद मिळाला

काजळाचा टीका लावते 

ग्रहण लागू नये या क्षणाला


ऐक सख्या एकदा

या मनाची अस्थिरता

कस सांगू तुला 

या भावना मनातल्या


त्या मोहक चांदण्या रात्रीत

मिठीत तुझ्या उमलतांना

नकळत कधी मी माझ्या 

काळीज अर्पिले तुला


नाजूक हळुवार स्पर्शात तुझ्या

हलकेच शहारून गेले 

जणू मनाच्या बगीच्यात

अप्रतिम फूल उमलले


आल्हाद सहवासात तुझ्या

आचिंब ओले भिजताना

मनही माझे ना राहीले

तुझ्यात गुंतत असताना


शालू नेसूनी चांदण्यांचा

पुन्हा रात्र अवतरली

सुखाचे ते क्षण वेचण्या मी

मिठीत तुझ्या विसावली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance