STORYMIRROR

Sanjay Jadhav

Romance

3  

Sanjay Jadhav

Romance

ते दिवस

ते दिवस

1 min
218

ते दिवस आता कुठे 

भेट आपुली व्हायची 

ते नदीकाठी भेटणे 

भान विसरून जायचे 


ते दिवस आता कुठे 

तू स्वप्नात यायची 

हळुवार येऊन मज 

साद तू घालायची 


ते दिवस आता कुठे 

कानात हळुवार सांगायची 

अलगूज तुझ्या मनातील 

काव्यातुनी सांगायची 


ते दिवस आता कुठे 

फुलला संसार आपुला 

गर्क तू या संसारी 

विसरलीस तू स्वतःला 

 

ते दिवस आता कुठे 

भान तुजला न राहिले 

ती पूर्वीची वेल तू 

बहरली पाना फुलांनी 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance