चरण पुष्प
चरण पुष्प
1 min
233
साजिरे हे रूप
गोजिरे हे रूप
पाहता तुझे रूप
भक्तीमय स्वरूप
विसरलो मी दुःख
पाहता तुझे श्रीमुख
चरण कमल रज
लागताच सहज
लागली समाधी
झालो मी तल्लीन
पाहता श्रीहरीस
आनंदले माझे मन
पाहून मी भुललो
नाम घेत राहिलो
हरी नामात रंगलो
दंग मी जाहलो
विसरलो देहभान
गाता तुझे गुणगान
कंठाशी आला प्राण
अंतरात रममाण
याचना करी तुज
धाव रे गोविंद
तुजवीण रे मज
न मिळे आनंद
