स्वप्न
स्वप्न
1 min
209
सुंदर असावं स्वप्न
जशी असावी फुलांची माळ
मनात रचलेले शब्द
व्हावे स्वप्नी शब्दांची माळ
यावे ऐकू कानी
मनीचे माझ्या काव्यभाव
यावे ओठावर गोड
काव्यफुलांची सुमधुर लहर
स्वप्नात फुलला असा
शब्दांचा काव्य मळा
न बोलता कसा
कळला भाव माझ्या मनीचा
हलकी सर जशी
सुखद देई गारवा
श्रावणातील शुभ्र जलधारा
खुणावती मज यावे झरझरा
रिमझिम रिमझिम धारा
वाहती स्वप्नातुनी माझ्या
फुलली हिरवळ वाहे झरा
फुलले काव्य हृदयी माझ्या
आनंदले मन माझे
घेई स्वप्नात भरारी
जसा झोका जाई उंच तसे
काव्य बहरून मन घेई भरारी