श्रावणधारा
श्रावणधारा
1 min
265
या रिमझिम रिमझिम
बरसती पाऊस धारा
या रिमझिम रिमझिम
मज खुणावती जलधारा
हो श्रावण धारा
वाहे झरा भरभरा
फिरे भोवरा गरगरा
खळखळती या जलधारा
मन माझं घेई
उंच उंच भरारी
काळ्या सावळ्या
मेघातुनी पडती सरी
हिरवे हिरवे जसे
तृणपर्ण पसरलासे
मखमल मज भासे
हिरवळ जणू दिसे
ओल्या ओल्या सरी
गवतावर वर्षाव करी
तरुवर कोसळती सरी
हसते जणू श्रावणसरी
बरसू लागे मेघराजा
सावळ्या काळ्या घनी
लपंडाव खेळे रविराजा
श्रावणात नाचे अंगणी
कधी येतो कधी जातो
ऊन पाऊस खेळ चालतो
डोंगर दरी कोसळतो
क्षणात रवी प्रगट होतो
