प्रतिबिंब
प्रतिबिंब
1 min
248
पाहिले मी पाण्यात
दिसलें मला प्रतिबिंब
अन दिसला तो लाललाल
सूर्यबिंब लाललाल सूर्यबिंब
पाहिले मी आरशात
अन दिसलें मला प्रतिबिंब
अन रूप माझे मलाच
खुणवी आरशात खुणवी आरशात
पाहिले मी अंतरात
अन दिसलें मज प्रतिबिंब
सांगे मला मग हळूच
कारे बाबा भुललास
राहतो मी हृदयात राहतो मी हृदयात
पाहिले मी सागरात
अन धस्स झाले उरात
दाट काळेकुट्ट पाणी पहा रे
केलेस तू प्रदूषित केलेस तू प्रदूषित
पाहिले मी आकाशात
अन सुन्न झाले माझे मन
वातावरणातील प्रदूषण
मन झाले माझे विषन्न
मन झाले माझे विषन्न
