STORYMIRROR

Pradnya Warade Narkhede

Romance

3  

Pradnya Warade Narkhede

Romance

आस तुझ्या प्रेमाची

आस तुझ्या प्रेमाची

1 min
265

अथांग पसरलेला सगळीकडे

तरी तहान सागराला नदीच्या पाण्याची।।

आहे गर्भात साठलेलं जल

तरी वाट धरणीला पावसाची।।

शीतल मोहक शांत रूप

तरी ओढ चंद्राला नक्षत्राची।।

आकर्षक रंगछटा अंगावरती

तरी हाव फुलपाखराला फुलांच्या रंगांची।।

प्रेमाची संदूक सोबतीने

तरी अजूनही आस तुझ्या प्रेमाची।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance