आस तुझ्या प्रेमाची।।
आस तुझ्या प्रेमाची।।
अथांग पसरलेला सगळीकडे
तरी तहान सागराला नदीच्या पाण्याची।।
आहे गर्भात साठलेलं जल
तरी वाट धरणीला पावसाची।।
शीतल मोहक शांत रूप
तरी ओढ चंद्राला नक्षत्राची।।
आकर्षक रंगछटा अंगावरती
तरी हाव फुलपाखराला फुलांच्या रंगांची।।
प्रेमाची संदुक सोबतीने
तरी अजुनही आस तुझ्या प्रेमाची।।

