STORYMIRROR

Pratibha Barhate

Romance

3  

Pratibha Barhate

Romance

आयुष्याच्या संध्याकाळी

आयुष्याच्या संध्याकाळी

1 min
442

आयुष्याच्या संध्याकाळी,

फक्त तुझा हात हाती असावा.

धनसंपत्ती, संतती काही नको,

तुझ्याच प्रेमाचा सहारा असावा.


तूच दाखवशील,

असा देखावा असावा.

मी भरपूर बोलेल,

ऐकण्यासाठी जवळ तूच असावा.


आयुष्याच्या संध्याकाळी,

पुन्हा तुझ्या प्रेमात पडावे. 

अगदी शेवटच्या क्षणापर्यंत,

तू आणि मी एकमेकांसाठी झुरावे.


आयुष्याच्या संध्याकाळी,

लोकांनी आपल्या प्रेम कहाणीला पहावे.

आपण मेल्यानंतरही,

आपल्या प्रेमासारखे दुसऱ्यांनी वागावे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance