STORYMIRROR

Pratibha Barhate

Others Children

3  

Pratibha Barhate

Others Children

शाळा गमती जमती

शाळा गमती जमती

1 min
266

बाजाराची पिशवी दप्तर आमचे

काळी पाटी सर्वकाही ज्ञान शिकवी

धरतीवर बसून शिकायचे

जिल्हा परिषद नाव तिचे

गण्या नवीन चड्डी घालून शाळेत गेला

मिळवू लागला स्वतःला राजा सारखा

मास्तरांनी विचारता आनंदाचे कारण

गण्या आनंदाने चड्डीला हात लावत

वर्ग सारा हसता झाला

जुना सदरा नवीन चड्डी

असा काहीसा अवतार गणेश धरी

या सुट्टीत मजा झाली

गण्याची नवी चड्डी खेळतांना फाटली

गण्याची चांगलीच उडली घाबरगुंडी

अशी कशी हो फाटली गण्याची चड्डी

आज गण्या मोठा अधिकारी झाला

फाटक्या चड्डीमुळे आठवणीत राहिला

किती हो सांगायच्या शाळेच्या गमतीजमती

आज जवळ नसले शाळेचे सोबती

आठवण येता आजही पाणी येई डोळी

अशीच साधी सोपी सरळ होती आमची जीवनशैली

देवा काही द्यायचे असेल तर लहानपण पुन्हा दे

तीच आमची शाळा आणि मस्ती

आयुष्यभर टिकणारे शिक्षण आणि अनुभव

यांची घेतली शिदोरी

चालू केला जीवनाचा प्रवास आता

पाहूया आता पुढे येईल कशा वाटा


Rate this content
Log in