STORYMIRROR

Pratibha Barhate

Others Children

3  

Pratibha Barhate

Others Children

ससा

ससा

1 min
267

पांढरा पांढरा ससा

डोळे लाल लाल

बसला हिरव्या गवतात

टवकारून दोन्ही कान


सावध वेगवान असा

सगळ्यांनाच आवडतो लुसलुशीत ससा

बीळ करून जमिनीत राहतो कसा

पिंजलेला कापूस जसा


गर्व त्याला त्याच्या वेगाचा

पांढर्‍या शुभ्र दिसण्याचा

 भित्रा म्हणते जग त्याला

अति चंचल स्वभावाचा


कधी भेटतो हा कथेमध्ये

 कधी असतो कवितेमध्ये

लहान मुलांच्या स्वप्नामध्ये

श्रीमंतांच्या बागेमध्ये


Rate this content
Log in