STORYMIRROR

Pratibha Barhate

Inspirational Others

3  

Pratibha Barhate

Inspirational Others

महिला मुक्तीदिन

महिला मुक्तीदिन

1 min
232

धन्य धन्य झाला महिला समाज हा

आभार मानू किती सावित्री ज्योतिबा

चूल आणि मूल होते नशीब आमचे

अंगणापर्यंत होते अस्तित्व आमचे


केले कितीही काम तरी

कौतुक कुठेही होत नसे

घरात असूनही आम्हास

कोणीही काही विचारत नसे


परंपरा रूढी फक्त आमच्या पुरतीच

साथ देयचा जोडीदारही फक्त क्षणा पुरतीच

टोमणे रुसवे-फुगवे अपमानाचे

का सहन करावे जे नव्हते कधीच आपले


कमाल केली सावित्रीज्योती

प्रचंड दुःखातून दिली महिलास मुक्ती

फेडण्या उपकार तुमच्या कामाचे

उंच भरारीस केले आभाळ मोकळे


श्वास घेतो सुखाचा फक्त तुमच्यामुळे

मान मिळाला जीवनात फक्त शिक्षणामुळे

आता नाही कुठे थांबायचे

असेच पुढे चालू ठेवायचे


50 टक्के आरक्षण दिले

शंभर करून दाखवू

आम्हीही कमी नाही

पुरुष जातीस नक्कीच दाखवू


केली भरपूर गुलामी तुमची

आजही होत आहे चेष्टा-मस्करी आमची

छेडखानी, बलात्कार कधी ऍसिड फेकूनी

शिकवू धडे संस्काराचे कलम वापरून कानूनी


नाजूक, कोमल, अबला, हतबल

मुळीच समजू नका आम्हास

शिक्षण कायद्याने दिले पंखात बळ

येतात गनिमी कावे आम्हास


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational