सुंदर साजणी
सुंदर साजणी
नयनी भरली,
चांदणी दिसली,
सौंदर्यवती ती,
मनास भावली ।।1।।
माझी शब्दफुले,
अर्पितो चरणी,
समज प्रेमास,
लाजली सजनी ।।2।।
नयनकटाक्ष तो,
तिचा मजवरी,
बावरली जणू,
सजली नवरी ।।3।।
माझी शब्दफुले,
लावून उराशी,
गालात हसली,
सुंदरी जराशी ।।4।।
तिच्याही मनात,
समुद्र प्रीतीचा,
सुगंधी तनात,
होकार प्रेमाचा ।।5।।

