दुरावा
दुरावा
गेला साजन दूर देशी
पडलं चांदणं टिपूर आकाशी
आली अशी शिरशिरी अंगी
मी न्हाले प्रेम रंगी ।।१।।
का झोबंतो वारा हा लहरी
नाही साजन माझ्या शेजारी
आले आसवं डोळी
कोण पुसणार हे पाणी ।।२।।
काही केल्या मेली ही रात सरत नाही
तुझ्याविना वेड्या मला झोप येत नाही
तू नको मीच येते तुझ्या पाशी
का गेला साजन दुर देशी ।।३।।
मी वेडी होईन तुझी सावली
सामावून जाईन तुझ्या अंतरी
तू चंद्र माझा मी तुझी चांदणी
वाट पाहते मी तुझ्या अगंणी ।।४।।
तू जाता दुर देशा
बदलतात सगळ्यांच्याच नजरा
मी पाहताना माझ्या हातातील रेषा
नाही मिळत कोणाचाच आसरा ।।५।।

