STORYMIRROR

Pratibha Barhate

Romance Others

3  

Pratibha Barhate

Romance Others

प्रेमाचा महिना

प्रेमाचा महिना

1 min
226

सुंदरी बोचऱ्या थंडीत

स्वार सायकलीवर

धुक्यात अवतरली अप्सरा जणू

साजेसे तिचे रंग-रूप


मी घायाळ तिला पाहताच

पडलो प्रेमात पहिल्या भेटीत

नजरानजर आमची झाली नाही

मी दुरूनच भाळलो राणीवर


रस्त्यात दुसऱ्याच दिवशी उभा मी

हाती घेऊनी फुल गुलाबी

थोडी घाबरली बावरली माझी प्रियसी

पुढे जाऊनि मागे वळली


 तिने मला पाहताच

मी चिंब पावसात भिजलो

ती तर लाजून निघून गेली

मी माझाच कुठे राहिलो


ध्यास तिचाच मनी

आठविते तीच क्षणोक्षणी

कधीच स्वीकार करशील माझ्या प्रेमाचा

झुरत राहतो मनोमनी


प्रेमाचा महिना फेब्रुवारी

दिवाना करी प्रेम युद्धाची तयारी

एकदाच तिला सांगून टाकायचं

तिच्या मनात घर करून राहायचं


आला जवळ तो शुभ मुहूर्त

देऊन टाकले प्रेमपत्र

नाही नाही म्हणता तिने घेऊन टाकले

असे सुरू झाले प्रेमाचे नवे पर्व


रोजच तिची वाट पाहू लागलो

येताना भेट वस्तू घेऊन येऊ लागलो

कर्जबाजारी होऊ लागलो होतो प्रेमात

नेट ही कमी पडू लागलं आमच्या गप्पात


तिचे रुसवे-फुगवे काढताना

प्रेम का केलं ?

मीच पश्चाताप करतो

बाबांकडून काहीतरी शिकावं म्हणतो


एकदा कळले तिच्या बापाला

कुत्र्यावानी मला हणला

मी जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारी आईला

मला जन्म दिल्याचा पश्चाताप झाला


कळलं तेव्हापासून प्रेम काय असतं?

पहिल्या नजरेत प्रेम म्हणजे फक्त आकर्षणच असतं

म्हणूनच ते क्षणात विसरून जातं

दुसऱ्या क्षणाला पुन्हा नवं पाखरू मन शोधू लागतं 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance