STORYMIRROR

Ganesh Phapale

Romance Others

3  

Ganesh Phapale

Romance Others

पत्र म्हणजे तरी काय?

पत्र म्हणजे तरी काय?

1 min
220

पत्र म्हणजे तरी काय असें..?

पत्र म्हणजे भाव मनाचे रेखाटले जसेच्या तसे..!

पाठवणी त्याची हातो हात गेली,

जादू शब्दा-शब्दाची मनावर झाली..!

कोणी लपविले तर कोणी पळविले

सांगा ना पत्र तुम्हा कोणी पाठविले..?

कुतूहल किती रे ते मोठे मनास वाटले,

चोरट्या नजरेने पत्र ते उघडले भाव मनाचे मनाला ते कळले..!

कधी अलगद हसून मन फुलले,

कधी विरहाचे अश्रू ही घरगंळले..!

नाते ते पत्र लेखणीचे आज पडद्याआड गेले,

पत्र लेखणीत आज हात हे विसावले..!

जग हे अता मल्टिमीडीयाकडे सरसावले,

पत्र आणि टपाल मात्र वाट पाहत तसेच उभे राहिले..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance