STORYMIRROR

Ganesh Phapale

Romance

3  

Ganesh Phapale

Romance

✨प्रितीच वारं शिरलं✨

✨प्रितीच वारं शिरलं✨

1 min
287

दोघांच्या बोलण्यात होता गोडवा

ती लेखीका तो लेखक कसा येईल दोघात कोणता शब्द आडवा,,?


तो म्हंणतो सुंदर दिसतेस तू जणू स्वर्ग सुंदरी,

ती ही म्हंणते किती रे छान बोलतोस तू, शब्द तुझे करतात जादू मनावरी..!


चल ग काहीतरीच तुझ, हसतेस छान तु, त्याहून सुंदर खळी तुझ्या गालावरी,

हास्य खळखळलं आणि लाजून तिने तिरकच त्याच्याकडे पाहिलं...


जरा लाजतच तिने तोंड तीच उघडलं

वेडा आहेस रे तु फिल्मी भुत तुझ्यात शिरलेलं..!


तो शहारला थोडा तो नरमला भुत तर शिरलय पण ते फिल्मीच नाही

तुझ्या रूपाच तुझ्या गोड प्रितीच भुत माझ्यात शिरलं,


नाजूक हास्य ओठी तीच्या तरलं,

जरा जवळ करत तीने त्याला हताशी धरलं वेड्या तुझ्या या वेडेपणानीच रे मला घेरलं,.!


प्रेम रंगाच प्रेमळ वार ते दोघांत शिरलं,

एक मेकांच्या नजरेत त्यांच विश्व सामावून गेल,

प्रित वेड्या लेखक,लेखिकेने प्रेम जाळ हे हळूवार विनलं..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance