STORYMIRROR

Ganesh Phapale

Inspirational Others

3  

Ganesh Phapale

Inspirational Others

हिरवळीत मन रमलं

हिरवळीत मन रमलं

1 min
202

हिरव्या हिरव्या हिरवळीत मन रमलं

फिरता फिरता रंगबिरंगी फुलांच जीवन मला अलगद उलगडलं... 


रातभर ऊमलली रातराणी 

एक दिनाच जगणं मात्र अस्तित्व

ठेवून गेली ती जागेवरच सुगंधानी... 


बहरल्या वेली चहुबाजूंनी, 

मोहरले फुलपाखरू बेभान फिरूनी

 रंग वेगवेगळे आली पंखावरी ती अवतरूनी... 


ग्रीष्म वसंत बहरला अंगी गारगार वारा

भिरभिरला 

ताल सुर सरींनी धो धो धरला

ईंद्रधनुने त्यातच डाव रंगाचा साधला... 


ऊंच शिखरे उभी डोलावती

खोल दरी, खाच खळगे, माना तेथूनच ऊंचावती. 

ईवलुसे गवतही डौलात वाऱ्यावर झुलती... 


किमया ही सृष्टीची मन तृप्त करते

बघण्या नजर सौंदर्य ते निसर्ग टिपण्या तरसते... 

मेघ गरजता, मन आनंदी-आनंद होते... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational