!!आई ती आईच असते!!
!!आई ती आईच असते!!
आई ती आई असते,
तिच्यासारखे हृदय कुणाचेच नसते..
सगळे दुःख ती सोसते
लेकराच्या सुखात मनभर ती हासते..
आई ती आईच असते
तिच्यासारखे हृदय कोणाचेच नसते..!
राबराब राबते अख्ख्या धुरात
चुलीवर ती वेडी भाकऱ्या भाजते,
अख्ख्या धुरात चुलीवर ती वेडी भाकऱ्या भाजते,
आधी लेकरू खाईल मग उरलं तर ती खाते,
खरंच आईसारखे हृदय कोणाचेच नसते..!
लेकरासाठी पदराची सावली करते
वेळ आली तर तोच पदर जगापुढे पसरते
हौस लेकराची ती तळमळीने भागविते
हौस लेकराची तळमळीने ती भागविते,
खरंच आई ती आईच असते..!
उन्हा-तान्हात हो उन्हा-तान्हात
काट्या-कुट्यात अनवानी चालते फिरते,
पायातली चप्पल लेकराच्या पाई देते
एक हाताशी तर एक कडेवर ती घेते..!
आई ती आईच असते,
तिच्यासारखे हृदय कोणाचेच नसते..!
बाप पितो घरी येऊन आईपाशीच धिंगाणा करतो
किलकिल्या डोळ्यांनी पोरगा ते पाहतो
किलकिल्या डोळ्यांनी पोरगा ते पाहतो
हळूच कुशीत आईच्या शिरून विचारतो बाबा का गं असा वागतो..?
मायेने हात लेकराच्या तोंडावर फिरवत तशीच मुक ती गिळते,
आई ती आईच असते
लेकरापायी सगळंच ती सोसते..!
आई ती आईच असते
तिच्यासारखे हृदय कोणाचेच नसते..!
