दिदू ग लाडली माझी तू
दिदू ग लाडली माझी तू
शब्द नवे-नवे ओठी गुंफले,
नाते हे बहिण भावाचे अलगद बहरले...
साज शब्दांना हळुवार चढले,
धाग्यावर एका रंग पावित्र्याचे रंगले...
ग दिदू सोबतीने तुझीया
भाग्य माझे जगमगुन गेले,
ऐकून हाक एक तुझी, क्षण माझे सारेच सुखावले...
गोड गोंडस तू ग परी जणू या जगताची राजकुमारी,
अवखळ अल्लड सोबत तुझी
मज वाटते भारी-भारी...
हुशार तू ग चंचल मन तुझे
शब्दा शब्दांची तुझ्याकडे आहे जादूगरी...
लाडली बहिण तू माझी छोटुशी ग परी,
करतो एकच ही प्रार्थना ईश्वरचरणी
सदा बनुन राहो ईश्वराची कृपा तुजवरी...
मनी ऊठला प्रश्न एक मोठा, देऊ काय आज तुजला..?
जागेल सदा मी या शब्दाला आणि जपेल भाऊ बहिणीच्या या नात्याला,
हेच वचन आज देतो दिदू मी तुला...
